Home Love १०० नववधू करिता उखाणे – Marathi

१०० नववधू करिता उखाणे – Marathi

by Vaishali Ashutosh Bhoyar
0 comment 459 views 11 minutes read

१०० नववधू करिता उखाणे – Marathi

१. घरच्या देव्हारयात आहेत ब्रम्हा विष्णु महेश.. रावांच्या नावाने मी करते गृहप्रवेश.

२. जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने.. रावांच नाव घेते पत्नी या नात्याने.

३. सासु सासरे आहेत ध्न्यानी, आई वडिल आहेत सदगुणी.. रावांच्या नावानी मी गळ्यात घातले काले मणि.

४. हरित्त्रुनांच्या मख्मलित दव्बिन्दुंची जाळी.. रावांचे नाव घेते…च्या वेळी.

५. आई अम्बेचा पाई हळदी कुंकांच्या राशी.. रावांचे नाव घेते… च्या दिवशी.

६. श्रीकृष्ण रथावर बसून करतो सारथ्य.. आशुतोष – वैशालीच्या संसारात होईल सर्वांचे आदरातिथ्य.

७. माहेर आहे प्रेमळ, सासर आहे हौशी.. रावांच नाव घेते… च्या दिवशी.

८. फुल तेथे गंध, काव्य तेथे कविता.. रावांच नाव घेते तुम्हा सर्वान्कारिता.

९. काव्य तेथे कविता, चन्द्र तेथे चन्द्रिका.. रावांना भेटले मी जशी सागराला भेटते सरिता.

१०. चंद्राचा होता उदय समुद्राला येते भरती.. रावांच्या दर्शनाने माझे श्रम हरती.

११. (आडनाव) घराण्याचा अंश आला आहे पोटी.. रावांच नाव सतत राहिल ओठी.

१२. रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास.. रावांच नाव घेते तुमच्यासाठी खास.

१३. गंगेचा काठी कृष्ण वाजवितो पावा.. रावांच नाव घेते सर्वानी आशीर्वाद दयावा.

१४. दत्तापूढे गाय शिवापुढ़े नंदी… रावांचा स्वभाव नेहमीच आनंदी.

१५. सुगंधी सुपारी, विलायची आणि काथ.. रावांच नव घेते एका सेकंदाच्या आत.

१६. गळ्यात मंगलसूत्र, मंगलसूत्रात डोरलं.. रावांच नाव मी ह्रुदयात कोरलं.

१७. संगमरवरी देवूळlत बसविली रामाची मूर्ति.. रावांशी लग्न करून झाली इच्छापुर्ति. 

१८. नीलगगन आकाशात चांदण्याच्या राशी.. रावांच नाव घेते… च्या दिवशी.

१९. नदीकिनारी कृष्ण वाजवितो बासरी.. रावांच नाव घेते, मी सुखी आहे सासरी.

२०. कन्नव रूशिचे आश्रम, शकुन्तलेचे माहेर… रावानी केला मला सौभाग्याचा आहेर. 

२१. चांदीच्या ताटात, फंसाचे गारे.. राव दिसतात तसे बरे पण वागतील तेव्हा खरे.

२२. माहेरची तुळस, सासरच्या अंगणात, माझे पदार्पण झालेत.. रावांच्या जीवनात.

२३. आकाशात चमकतो तारा, अंगठित चमकतो हिरा.. रावांनी मंगलसूत्र घातलं तोच दागिना खरा.

२४. लग्नाच्या पंगतीत ठेवले गुलाबजामुन दहिवड़े.. वधू पुढे रावांना काहीच ना आवडे.

२५. सासरी जाताना डोळ्यात अश्रुंची झाली गर्दी, तसे आमचे.. राव आहेत फारच दर्दि.

२६. माझ्या आयुष्याची मीच आखेन रूपरेषा.. रावांनी त्यात रंग भरावे हीच माझी मनीषा.

२७. मंगलमय गणेश मूर्तीचे दर्शन मनाला देते प्रसन्नता.. रावांबरोबर संसार माझा फुलला हसता हसता.

२८. बिल्लावपत्र तुलशिपत्र सोबत पूजेत मान मंजिरीचा, कानात गुन्गुन्तोय 

आवाज.. रावांच्या प्रेमळ बोलण्याचा.

२९. संक्रांतिच्या दिवशी तिळlचे कळते सत्व.. रावांचे नाव घेते आज हळदी कुंकवाचे महत्त्व.

३०. अमरावतीच्या अम्बादेवीला सोन्याचा साज.. रावांच्या बरोबर शुभमंगल झाले आज.

३१. शरदाचे सरले अस्तित्व वसंताची लागली चाहुल.. रावांच्या संसारात टाकते मी पाहिले पावुल.

३२. नव्या दिशा नव्या आशा नव्या घरी पदार्पण.. रावांच्या जीवनात माझे सर्वस्व अर्पण.

३३. आधी घातला चंद्रहार मग घातली ठुशी.. रावांच नाव घ्यायची असते नेहमीच ख़ुशी.

३४. वडिलांचा आशीर्वाद मातेची माया.. रावांसारखे पति मिळाले हीच ईश्वराची दया.

३५. कुरळ कुरळ केसाला टॉवेल दया पुसायला.. रावांच नाव घ्यायला इतका आग्रह कशाला.

३६. मंगलसुत्राच्या दोन वाट्या, सासर माहेरची खून.. रावांच नाव घेते मी… ची सून.

३७. सुखावलेल हृदय त्यात आनंदाचे क्षण.. रावांची प्रीती हेच माझ खर धन.

३८. सूखी माझा संसारात नित्य लागे सांजवात, पावलो पावली मिळे मला.. रावांची प्रेमळ साथ.

३९. सनई आणि चौघडा वाजे सप्त सुरात.. रावांच नाव घेते.. च्या दारात.

४०. देवीच्या मंदिराला सोन्याचा कळस.. रावांच नाव घ्यायला मला येत नाही आळस.

४१. आईनी केले संस्कार, वडिलांनी केले सक्षम.. सासू – सासऱ्यांच्या छायेत.. रावांच्या संसाराचा पाया करीन भक्कम.

४२. बालपण गेले आईवडिलांच्या पंखाखाली, तारुण्यात मिळाली मैत्रीची साथ, संसाराच्या वळणावर मिळाला.. रावांचा प्रेमळ हात. 

४३. समुद्रात सापडतात शंख शिंपले आणि मोती.. राव माझे पती तर सांगा माझे भाग्य किती. 

४४. सर्व दागिन्यात श्रेष्ठ आहे काळे मणि.. राव आहेत माझ्या कुंकवाचे धनि. 

४५. कळी हसली फुलं उमलली, मोहरून गेला सुगंध.. रावांच्या सोबतीत गवसला जीवनाचा आनंद.

४६. दागिना नको ठुशी नको, नको चंद्रहार.. रावांच नाव हाच माझा खरा अलंकार. 

४७. परिसाच्या सहवासात झाले लोखंडाचे सोने.. रावांच्या कृपेने लाभले मला सौभाग्याचे लेणे.

४८. खडीसाखरेची गोडी आणि फुलांचा आनंद.. रावांच्या संसारात स्वर्गाचा आनंद. 

४९. रोशनाईच्या झगमगीत साजरी सुंदर वाट.. रावांचे नाव घेते.. च्या दारात.

५०. आई वडिलांनी केले लाड, सासू सासऱ्यांनी पुरवली हौस.. रावांचे नाव घ्यायला मला वाटते मौज. 

५१. मंगळसूत्राची वाटी पावित्र्याची खूण.. रावांचे नाव घेते मी ..ची सून.

५२. पौर्णिमेची उज्ज्वल प्रभा.. राव हेच माझा संसाराची शोभा. 

५३. पादस्पर्शाने ओलांडते उंबरठ्यावरचे माप.. रावांची पत्नी म्हणून गृहप्रवेश करते आज.

५४. रातराणीच्या सुगंधाने आसमंत झाले मोहित.. रावांचे दीर्घायुष्य मागते सासू सासरयांसहित.

५५. हिरव्या हिरव्या राणात मोहक पिवळी फुले.. रावांच नाव घेताना मन झोपाळ्यावर झुले.

५६. निसर्ग रम्य पर्वतावर घनदाट वृक्षांच्या रांगा.. रावांच नाव घ्यायला मला कधीही सांगा. 

५७. कुंकू लावते ठळक हळद लावते किंचित.. राव झाले माझे पती हेच माझ पूर्वसंचीत.

५९. मंदिराचे वैभव, त्यात परमेश्वराची मूर्ति.. रावांचे नाव घेवुन करते इछापुर्ती.

६०. खडीसाखरेची गोडी, अन फुलांचा सुगंध.. रावांच्या संसारात मिळतो स्वर्गाचा आनंद.

६१. कपाळी कुंकू अणि हिरवा चुडा हाती.. राव आहेत माझे पति तर सांगा माझे भाग्य किती.

६२. पतिव्रतेचे व्रत घेवून, नम्रतेने वागते.. रावांचे नाव घेताना, आशीर्वाद मागते.

६३. श्री विष्णुच्या मस्तकावर सदैव असतो शेष… रावांचे नाव घेवून करते गृह्प्रवेश.

६४. यमुना जलावर पडली ताजमहालाची सावली.. रावाना जन्म देणारी धन्य ती माऊली.

६५. पर्जन्याच्या वृष्टिने सृष्टी होते हिरवीगार.. रावांच्या नावाने घालते मंगलसुत्राचा हार.

६६. पूजेच्या साहित्यात असतो उदबत्तिचा पुडा.. रावांच्या नावाने भरला मी सौभाग्याचा चुडा.

६७. धरला यांनी हात, वाटली मला भीती.. तेव्हा हळूच राव म्हणाले अशीच असते प्रीति.

६८. अंगणी होती तुळस तिला घालत होते पाणी.. आधी होते आई बाबांची तान्ही अणि आता झाले रावांची राणी.

६९. नाजूक अनारसे साजूक तुपात तऴlवे.. रावांसारखे पति जन्मोजन्मी मिळावे.

७०. प्रेमळ शब्दामागे भावना असते कौतुकाची.. रावांच्या साथीने सुरुवात करते सहजीवनाची.

७१. शुभमंगल प्रसंगी अक्षदा पडतात माथी.. राव आहेत माझे जीवनसाथी.

७२. सुशिक्षित घरान्यात जन्मले, कुलवंत घरान्यात आले.. रावांशी लग्न करून सौभाग्यवती झाले.

७३. मंगलदेवी मंगलमाता वंदन करते तुला.. रावांचे नाव घेते अखंड सौभाग्य लाभू दे मला.

७४. मंदिराच्या गाभाऱ्यात विट्ठालाची मूर्ति.. रावांची होवो सगळी कड़े कीर्ति.

७५. चांगली पुस्तके असतात माणसांचे मित्र.. रावांच्या सहवासात रंगविते मी संसाराचे चित्र.

७६. विद्येचं माहेरघर आहे म्हणतात पूणं.. रावांच्या संसारात मला काही नाही उणं.

७७. कवींच्या कवितेत मोरोपंताची आर्या.. रावांचे नाव घेते मी … ची भार्या.

७८. दोन वाती दोन ज्योति दोन शिंपले दोन मोती.. रावांची राहों मी अखंड सौभाग्यवती.

७९. नयन रम्य बागेत नाचत होता मोर.. रावांसारखे पति मिळाले भाग्य माझे थोर.

८०. निलकर्ण आकाशात पक्षी उडाले सात.. रावांची जन्मोजन्मी मिळावी मला साथ.

८१. संथ वाहे चंद्रभागा, मंद चाले होडी, परमेश्वर सुखी ठेवो… अन… ची जोड़ी.

८२. सोन्याचे पंचपाळ त्याला नागाचा वेढा.. रावांचा आणि माझा सात जन्माचा जोड़ा.

८३. सुंदर कादंबरया वाचून घ्यावा बोध.. रावांच्या संसारात लागला मला सुखाचा शोध.

८४. धुंद सूर छेडिता शब्द उमटले नवे.. रावांचे नाव घेते अखंड सौभाग्य मला हवे.

८५. शुभदिनी शुभकाली आली आमची वरात… रावांच नाव घेते… च्या दारात.

८६. शरदाच्या चांदण्यात चंद्र करतो अमृताचा वर्षाव.. रावांच्या यशाने झालाय त्यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव.

८७. सद्सद विवेक बुध्हिला असे शिक्षणाचे वरदान.. रावांच्या संसारात देईन मी सर्वाना मान.

८८. परिसाच्या संगतीने झाले लोखंडाचे सोने.. रावांच्या कृपेने लाभले मला सौभाग्याचे लेणे.

८९. गीतात जसा भाव, फुलात जसा गंध.. रावां सोबत जुळले मनाचे रेशमी बंध.

९०. हळद लावते कुंकू लावते, वान घेते घोळ।त.. रावांच नाव घेते सवासनिंचा मेळयात.

९१. सुगंधात न्हाल्या दिशा धुंद दाही हळूच.. रावांचे नाव माझा ओठी येई.

९२. प्रेमळ माझे आई वडिल, वत्सल सासु सासरे.. रावांच्या घरी येणार आता तारे हसरे.

९३. इन्द्रधनुच्या झुल्यावर मन झोके घेई.. रावांच्या संसारी बालकृष्ण येई.

९४. सौभाग्याची जीवन ज्योत प्रीत तेलाने तेवते.. रावांचे दीर्घायुष्य मी मंगळlगौरिस मागते.

९५. चांदीच्या समईत रेशमाची वात.. रावांबरोबर करते संसाराला सुरुवात.

९६. अंगणlतील तुलस पवित्र्याचे स्थान.. रावांमुले मिळाला मला सौभाग्याचा मान.

९७. तिळगुळlच्या देवघेविन दृढ होत प्रेमाच नात.. रावांच नाव घेते आज मकर संक्रांत.

९८. स्वाती नक्षत्रातील थेम्बाचे शिम्प्ल्यात होती मोती.. रावांच्या संगतीत उजळली जीवन ज्योति.

९९. यौवनात पदार्पण केले सरले माहेरचे अंगण.. रावांचे नाव घेवून सोडते मी कंकण.

१००. फुलला पळस रानोरानी मोहरला आंबा पानोपानी.. राव माझे धनी आणि मी त्यांची अर्धांगिनी

Disclaimer: This article is written by Vaishali AB, copying, or using it anywhere is a copyright violation. Appropriate action will be taken against any copyright violators.

You Might Be Interested In

You may also like

Leave a Comment

* By using this form you agree with the storage and handling of your data by this website.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00

Adblock Detected!

Please support us by disabling your AdBlocker extension from your browsers for our website.