५३ आजीचे अनुभवी सल्ले – Marathi

१.साखर मुंग्यांपासून सुरक्षित ठेवण्याकरीता साखरेच्या डब्यात वरच ४-५ लवंग ठेवाव्यात.
२.सूखे खोबरे तूरडाऴित खुपसून ठेवले तर ख़राब होत नाही.
३.रस्सा भाज्या खारट झाल्यास त्यात उकडलेला बटाटा घालावा,खारट पणा कमी होतो.
४.लिम्बाचा रस जास्त हवा असल्यास पाच-दहा मिनिटे लिम्बू कोमट पाण्यात भिजवून मगच रस काढावा, रस जास्त निघतो.
५.कोणताही पूलाव किंवा मसालेभात करताना तांदुळ १-२ तास पाण्यात भिजवून ठेवला तर साध्या तांदळlचा पण दाणा वेगळा आणि मोठा होतो.

६.बटाटे झटपट उकळण्याकरिता पाण्यात चिमटीभर हळद घालावी.
७.हिंगाचा वास टिकवीण्यासाठी हिंग तुरीच्या डाळीच्या डब्यात ठेवावा.
८.डाळ किंवा तांदूळाला किड लागण्यापासून जपण्याकरीता त्यात कडूलिंबाचा पाला घालावा.
९.दुधाला वीरजण लावताना आतून थोडीशी तुरटी फिरवावी.दही घट्ट होते.
१०.भाज्यांमध्हे मीठ शेवटी घातल्यास भाजीतले लोह (iron) टिकन्यास मदत होते.
११.भेंडीची भाजी शिजवताना त्यात दोन चमचे दही घातले तर ती चिकट होत नाही.
१२.पुरयांच्या कणकेत चिमटीभर साखर घातली तर पुरया बराच वेळ फुगलेल्या राहतात.

१३.छोले रात्री भिजवताना त्यात मूठभर हरभरा डाळही भिजवावी, त्याने छोले छान रस्सादार आणि दाट होतात.

१४.कट्ट्यावर लिम्बाच्या रसाचे पांढरे डाग पडल्यास त्यावर आल्याचा तुकडा घासावा, डाग जातात.
१५.कढ़ीलिंब एकदम बराच आणल्यास शिल्लक राहिला की सुकतो. अशा कढ़ीलिम्बाची पाने तेलात तळून, डब्यात भरुन ठेवावीत. त्याचा हिरवा रंग कायम राहतो व ते बराच दिवस टिकतात.
१६.गाजर, टमाटर, काकडी, बीट, मुळा मऊ किंवा शिळा झाल्यास रात्रभर मिठाच्या पाण्यात घालून ठेवाव्यात. ताज्या व टवटवीत होतात.

१७.कच्ची केळी दीर्घ काळ ताजी राहण्याकरीता ठंड पाण्यानी भरलेल्या पातेल्यात ठेवावी. साधारण १ आठवड्या पर्यन्त केळी टवटवित राहतात. हे पाणी २ दिवसांत एकदा बदलावे.
१८.पालेभाज्या शिळय़ा सुकलेल्या असल्यास पाण्यात १ चमचा विनेगार किंवा लिम्बुरस घालून ठेवल्या तर ताज्या होतात.
१९.शेंगदाणे भाजून झाल्यावर त्यात २ चिमटी मीठ टाकावे आणि गैस बंद करून थोड़े परतावे. त्याने साल लवकर सुटतात.

२०.पकोड़े चुरचुरीत हवे असतील तर त्यात बेसन पीठ भिजावताना जरासे मका पीठ घालावे.
२१.शेंगदाणे भाजण्यापूर्वी दाण्याला पाण्याचा हात लावून मग भाजावेत. दाणे खमंग भाजून होतात.
२२.भरीतासाठी वांगी चांगली भाजली जावी म्हणून त्याला पुसटसा गोड़ेतेलाचा हात किंवा सुरीने छोटी चिर पाडली तर भाजताना तयार होणारी वाफ पडेल. भाजल्यानंतर वांगी लगेच पातेल्याखाली झाकून ठेवल्यास साल नीट सुटतात.

२३.खीर करण्यासाठी दूध आटवताना त्यात जायफळ अजिबात घालू नये. त्याने दूध फाटते.
२४.एरंडेल तेलात हळद घालून गरम करावे. गार झाल्यावर तूर हरभरा डाळीना चोळल्यास डाळी पिवळ्या दिसतात. नंतर उन्ह द्यावे.
२५.मिठाला पावसाळयात पाणी सुटते. बरणीवर टिपकागद ठेवून झाकण घट्ट लावावे.
२६.पुदीना वाळवून पूड करून ठेवल्यास दही वड्यात उपयोगी पडतो.

२७.पाक केल्यानंतर साखरेचे परत कण बनू नयेत म्हणून पाकात थोड़े लिम्बू पीळावे.
२८.शिळा ब्रेड कड़क उन्हात वाळवून चूरा करून ठेवल्यास कटलेट करताना उपयोगी पडतो.
२९.फ्रीजर मधे बर्फाचा ट्रे ठेवताना त्याच्या खाली प्लास्टिक पेपर ठेवावा, काढताना ट्रे चटकन निघतो.
३०.रोज विशिष्ट भांड्यात आपण चाहा करतो. त्यास चहाचे डाग पडतात. ते भांडे घासण्या पूर्वी मिठाने चोळल्यास ते डाग चटकन जातात.
३१.पालक शिजवताना तो कच्चाच मिक्सर मधून वाटून मग फोडणीस टाकला तर हिरवा रंग कायम राहतो.
३२.हाताला मच्छी किंवा कांद्याचा वास येत असल्यास बेसन पीठ चोळावे आणि हात धुतल्यानंतर वास जातो.

३३.ताक आम्बट असल्यास त्यात पाणी घालून ठेवावे. वरचे पाणी थोड्या वेळाने अलगद काढून टाकावे. आम्बटपणा कमी होईल.
३४.ताक केल्यावर लोणी काढायच्या आधी हात चण्याचे, तांदुळाचे किंवा गव्हाचे पीठ लावून स्वच्छ धुवावे. लोण्याने हात बरबटट नाहीत आणि लोणी हाताला अजिबात चिकटून राहत नाही.
३५.ड्राई फ्रूट्स कापायचे असतील तर ते आधी १ तास फ्रीज़ मधे ठेवावे, नंतर त्याना गरम पाण्यात बुडवलेल्या सुरीने कापावे, लवकर कापले जातात.
३६.कोबी शिजवताना त्यात थोडेसे विनेगार घातले तर शुभ्र रंग कायम राहतो.
३७.कधी कधी तुरीची डाळ कूकरमधेही शिजत नाही म्हणून त्यात १ चिमटी मीठ, थोडेसे तेल, थोडीशी हळद व हिंग पूड घालून कुकार मधे शिजवली तर डाळ निट शिजतेच आणि स्वादही छान येतो.
३८.भाकरीचे पीठ जुने झाल्यास भाकरी नीट थापता येत नाही, तुटते. अशा वेळी पीठ गरम पाण्याने भिजवून थोडा वेळ झाकून ठेवावे. भाकरी चांगली होते.

३९.पावसाळयात माशा फार त्रास देतात तेव्हा लोखंडाचा एक तुकडा गरम करून त्यावर कापराच्या दोन वड्या टाकाव्यात म्हणजे माशा नाहीशा.
४०.दोस्याच पीठ हिवाळयात आम्बवण्या करीता थोड गरम पाणी मिक्सर मधे पीठ ग्राइंड करताना घालावे.
४१.लसूण किंचित गरम केला तर कळ्यांची साल लवकर सुटते.
४२.हिरवी मिरची जास्त काळ टिकण्याकरिता देठ काढून, मिरची साठवणीच्या ठिकाणी ठेवावीत.  

४३.कापलेल सफरचंद लाल होण्यापासून वाचण्याकरिता त्याला किंचित लिंबाचा रस लावा.
४४.लोणी नेहमी निर्लेपच्या फ्राई पैन मधे कढवा. भांड्याला बेरी अजिबात चिटकत नाही व भांडे त्वरित स्वच्छ होते.
४५.लाडू वड्या करताना पाकात पाण्याऐवजि दूध वापरले तर खव्यासारखी चव येते.
४६.वड्या करताना मिश्रण सैलसर झाल तर परत थोडा भिजवून मिल्क पावडर व पिठीसाखर घालून वड्या थापाव्या.
४७.करंजी, शंकरपाळ, चिरोटे या पदार्थांसाठी शक्यतो तुपाच मोहन वापराव। पदार्थ जास्त खुसखुशीत होतात.

४८.अनारसा तुपात टाकल्यानंतर विरघळला तर मिश्रणात थोड़ी तांदळlची पीठी मिसळlवी.
४९.अनारसा तळताना जाळी कमी पडल्यास खसखशित थोड़ी साखर घालून त्यावर अनारसा थापावा.
५०.घरात किंवा स्वैपाक घरात मोर पिसे ठेवल्यास पाली नाहीशा होतात.
५१.घराच्या कोपरया मध्ये बोरिक पावडर टाकून कॉक्रोचेस ला पळवता येइल.
५२.मिक्सरची पाती धारदार ठेवण्याकरिता महिन्यातून किमान एकदा तरी साध मीठ ग्राईण्ड कराव.
५३.कांदे आणि बटाटे एकत्र साठवू नये त्यानी बटाटे जास्त काळ चांगले राहत नाही.

Disclaimer: This article is written by Vaishali AB, copying, or using it anywhere is a copyright violation. Appropriate action will be taken against any copyright violators.

Related posts

Oats and banana pancake

Summer Drink to Cool Yourself

7 Yummy Yet Healthy Midnight Snacking Ideas For Night Owls

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Read More