१.सायकल ओईलचे डाग – कपड्यावर पडलेले डाग निलगिरी तेल लावून निघतात.
२.रक्ताचे डाग – रक्ताचा डाग पडलेला भाग दुधात भिजवून ठेवल्यास डाग निघून जातात . किंवा पाण्यात २ चमचे मीठ घालून ढवऴlवे व त्यात कपडा भिजत ठेवावा नंतर धुवावा.
३.पानाचे डाग – कपड्यावर पानाचे डाग पडले तर, लगेचच लिंबू कापून डागावर घसावेत स्वच्छ पाण्यात धुवावेत.
४.गंजाचे डाग – लिंबू व दही एकत्र डागावर, नंतर धुवावे. जुन्या गंजाचे डाग असतील तर ओक्सीलिंग असिड़ने कोरडेच घसावे नंतर धुवावेत.
५.रंगाचे डाग – ग्रीस आणि वार्निसचे डाग तर्फ़नटाइनने जातात.
६.डांबराचे डाग – प्रथम सुरिने तासावे, टरफनटाईन टाकावे व गरम पाण्यात धुवावे.
७.फळlचे डाग – डाळीम्बाचे डाग – कुठल्याही औषधाच्या गोळीची पावडर डागावर टाकून पाण्याने घासणे नंतर धुणे.
८.औषधाचे डाग – ओक्सीलिंग एसिड घालून घासून धुणे.
९.नेलपॉलिशचे डाग – एसीटोन व पोटाशियम पर्मंगनेट घालुन घासणे.
१०. गैस,स्टोव वरील तेलकट डाग – थोडेसे विनेगार कपड्यावर घेवून त्याने पुसावे. नंतर स्वच्छ धुवावे.
११.चाहा कपबश्या व किटलीवरचे डाग – विनेगार घातलेल्या पाण्यात कपबश्या बुडवून ठेवा नंतर जुन्या टूथब्रशनी घासावे.
१२.दरवाजे व खिडक्यांची तावदानावरचे डाग – चिखलाचे व धुळीचे डाग विनेगार पाण्यात घालून पुसल्यास स्वच्छ होतात.
१३.इस्त्रीचे डाग – डाग पडलेल्या भागावर लिंबू कापून घासावे व धुवावे.
१४.बाथरूम व किचन टाइल्स वरचे डाग – चमचाभर डीटरजंट पावडर पाण्यात घालावी त्यात व्हाइट विनेगार अर्धा कप घालावे व घासाव्यात.
१४ डाग कसे घालवावेत
1K
previous post